Join us

Maharashtra Weather Update : कसे असेल आजचे हवामान; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:31 IST

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून मोठे बदल व त्यांना दिसत आहेत. तर ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडी गायब झाली आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट

Maharashtra Weather Update : केरळ लगतच्या किनारपट्टी जवळ अरबी समुद्राच्या आग्नेयेला चक्राकार वाऱ्यांची(Swirling winds) स्थिती निर्माण झाली आहे तर उत्तरेकडील राज्यांमध्ये मैदानी क्षेत्रावर वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे या भागात थंडीचा(Cold) कडाका कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे. त्याचाच परिणाम महाराष्ट्रावर देखील होताना दिसतोय.

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच हवामानात(Weather) अनेक बदल होताना दिसत आहेत. मागील दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत होता. परंतु आता कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे थंडी गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पहाटेच्या वेळी थंडी जाणवते तर दिवसभर उकाडा जाणवतो. राज्यात येत्या काही दिवसात हवामान कोरडे व ढगाळ राहणार असून किंवा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, देशासह राज्यातील हवामानात बदल होताना दिसतोय. सध्या ढगाळ हवामान असून त्यात किमान तापमानात वाढ होताना दिसते. त्यामुळे थंडी कमी झाली आहे विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या सरी पडणार असून तेथे कमाल तापमानात काही अंशाने वाढ झाली आहे. तर मुंबईसह उपनगरामध्ये धुके पडत असल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी थंडी आणि धुके पडत आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

* वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : किमान तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानचक्रीवादळमहाराष्ट्रमराठवाडाविदर्भकोकण