Join us

Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळीचे संकट; वाचा आजचा IMD रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 10:24 IST

Maharashtra Weather Update: मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी ऊन अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट सविस्तर (Unseasonal weather)

Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी ऊन अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. (Unseasonal weather)

मे महिन्याला सुरूवात झाली तरीही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी गारपिट देखील झाली. मार्च महिन्यामध्येच राज्यात पावसाला पोषक असे वातावरण बघायला मिळाले. (Unseasonal weather)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज (४ मे) रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Unseasonal weather)

राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. एकीकडे पावसाचा इशारा असला तरीही राज्यात अनेक शहरांमध्ये पारा आज ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचे संकेत आहेत.

सोलापूरमध्ये सूर्य आग ओकताना दिसतोय. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवेल. काल राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा हा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे पहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, परभणी, यवतमाळ, वाशिममध्ये ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

आहिल्यानगर, गोदिंया, वर्धा, नागपूर, भंडारा, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, चंद्रपूर या भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यातील काही शहरांमध्ये तापमान थेट ४५ अंश सेल्सिअसवर गेले आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रच नाही तर कोकणातही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुपारच्यावेळी घराच्याबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांनी दुपारच्यावेळी घराच्याबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस असलेल्या पिक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यातील वातावरणात आर्द्रतेत वाढ; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजकोकणमराठवाडाविदर्भमहाराष्ट्र