Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : पुढील चार ते पाच दिवस उष्णतेचा पारा अजून वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:04 IST

मुंबईसह राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, आता पुढील चार ते पाच दिवस वायव्य भारत, गुजरात व महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक नोंदविण्यात येईल.

मुंबईसह राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, आता पुढील चार ते पाच दिवस वायव्य भारत, गुजरात व महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक नोंदविण्यात येईल, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

२३ एप्रिलपर्यंत तापमानात वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी राज्याच्या बहुतांश शहरांच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश नोंदविण्यात आला असून, यात मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे.

मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले असून, येत्या काही दिवसात मुंबईच्या कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

सोलापूर सर्वाधिक हॉट◼️ हवामान विभागाकडून मागील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, प्रत्यक्षात पाऊस आला नाही, तर तापमानात सलग सहा दिवस वाढ झाली.◼️ हवामान विभागाने बुधवार, १६ एप्रिल रोजी हॉट डे म्हणजेच उष्ण दिवस असण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या दिवशी तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.◼️ तर, १७ एप्रिल रोजी उष्ण दिवसासोबत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दिवशी दुपारी तसेच संध्याकाळनंतर रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.◼️ सध्या वाढत असणाऱ्या तापमानाचा आलेख पाहता बुधवार आणि गुरुवारीदेखील यात वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे नागरिकांना या दोन दिवसात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

कुठे किती तापमान?मुंबई - ३६.२ठाणे - ३८पुणे - ४०.८सातारा - ४०.३सांगली - ४०.७कोल्हापूर - ३९.६परभणी - ४१.८बारामती - ४०.३

अधिक वाचा: २० गुंठ्याच्या पेरू लागवडीतूनही होता येतंय लखपती; तरुण शेतकरी विक्रमची यशकथा

टॅग्स :हवामान अंदाजतापमानपाऊससोलापूरमुंबईपुणेमहाराष्ट्र