पुणे : सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणात दुपारी तीनचे कमाल तापमान सरासरीच्या जवळपास एक डिग्रीने कमी, तर पहाटेचे किमान एक डिग्रीने वाढलेले जाणवत आहे.
त्यामुळे तेथे दिवसा आल्हाददायकपणा, तर रात्री उबदारपणा जाणवत आहे. पुण्यातही तापमानात चढ-उतार जाणवत आहे. पुढील तीन दिवस राज्यामध्ये किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई, कोकण सोडून उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात परिस्थिती अशीच असली तरी पहाटेचे किमान तापमानातील वाढ ही अत्याधिक असल्यामुळे थंडीचा प्रभाव शनिवार (दि. ११) पासून संपूर्ण महाराष्ट्रात कमी झाला आहे.
बंगालच्या महाराष्ट्रावर उपसागरातून वारे आर्द्रता आणत असल्यामुळे पुढील आठवडाभर म्हणजे रविवार, दि. १९ जानेवारीपर्यंत थंडीचा प्रभाव असाच कमी जाणवणार असल्याची माहिती खुळे यांनी दिली.
अधिक वाचा: Tur Bajar Bhav : मागील महिन्यात १० हजारांचा भाव खात असलेल्या तुरीला पुढे कसा राहील दर?