Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : यंदा अधिक उन्ह व पाऊस मग कशी राहणार थंडी वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : यंदा अधिक उन्ह व पाऊस मग कशी राहणार थंडी वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : More heat and rain this year, then how the cold will be read in detail | Maharashtra Weather Update : यंदा अधिक उन्ह व पाऊस मग कशी राहणार थंडी वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : यंदा अधिक उन्ह व पाऊस मग कशी राहणार थंडी वाचा सविस्तर

आता यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आता यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

पुणे : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला. हवामान विभागाने १०६ टक्के सरासरी पाऊस सांगितला होता. त्यापेक्षा अधिक पाऊस झाला तसेच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास कमाल तापमान नोंदवले गेले.

आता यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. नवरात्रीमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार असून, येत्या ६ ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल, असा अंदाज देण्यात आला.

देशाच्या काही भागांमध्ये थंडी चांगलीच कडाडणार आहे. त्यामध्ये पूर्वेकडील राज्ये, दक्षिण भारतातील काही भाग असेल, येथे किमान व कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

यंदा मध्य भारतामध्ये उन्ह, पाऊस खूप होते, त्यामुळे थंडीदेखील चांगलीच जाणवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.

निना वादळाचा परिणाम
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 'ला निना' वादळाचा प्रभाव सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जर 'ला निना'चा प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल.

तीन दिवस पाऊस
६ ऑक्टोबरपासून पुन्हा तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Web Title: Maharashtra Weather Update : More heat and rain this year, then how the cold will be read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.