Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या आठवड्यात अनेक बदल झाले. काही ठिकाणी अति उष्णता जाणवली तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. तर काही ठिकाणी अवकाळीच्या सरी बरसल्या. त्यामुळे आता हवामानातील बदल लक्षात घेता कमाल तापमानात वाढ (Maximum temperature) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (२५ मार्च) रोजी पश्चिम महाराष्ट्रात हवामान उष्ण आणि कोरडे राहील, असा अंदाज आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि तुरळक पावसाची शक्यता आहे, पण जोरदार पाऊस पडणार नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (Maximum temperature) राज्यातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान २० अंश सेल्सियसच्या जवळपास राहील. पुणे येथे तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. तर मुंबई येथे किमान तापमान २५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या चटक्यांपासून स्वतः ची काळजी घ्यावी आणि पुरेसे पाणी प्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. (Maximum temperature)
शेतकऱ्यांना सल्ला
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.