Join us

Maharashtra Weather Update : रविवारी राज्यात कसे असेल हवामान; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 09:16 IST

Weather Update Today: राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढताना दिसत आहे. मुंबईतील तापमान ३७ अंश सेल्सिअसवर गेले आहे. जाणून घ्या कसे असेल आजचे हवामान.

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून काही जिल्ह्यातील तापमान ३७ अंश सेल्सिअसच्यावर पोहचले आहे. तर काही ठिकाणचे तापमानात घट झाली असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडी(Cold) जाणवत आहे.

फेब्रुवारी महिन्यातच तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिकांना उकाडा (Hot) सहन करावा लागत आहे. मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून ते ३७ अंश इतके झाले आहे. त्याचबरोबर पुणे आणि नागपूर मधील कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे. त्याबरोबरच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या शहरात कमाल तापमानात वाढ झाली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी रोजी राज्यातील वातावरण कोरडे राहून सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. राज्यातील तापमान उन्हाळ्याच्या प्रारंभीच तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर गेला आहे. त्यामुळे मे महिन्यात तापमान चटके देणार का असा सवाल नागरिकांना पडला आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांनी दुपारी बाहेर जाणे टाळावे आणि आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये चिलेटेड झिंक ५ ग्रॅम + चिलेटेड आयर्न ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* जनावरांचा घरी खुराक तयार करतांना सरकी/खापरी पेंड दूध वाढत म्हणून ३३% पेक्षा जास्त वापरली तर जास्त खर्च होतो आणि रक्तातील अमोनियाचे प्रमाण वाढून दूधातील जनावरे महिनोंमहिने उलटतात, म्हणून दुग्ध व्यवसायात ही काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा पारा वाढतोय; IMD ने दिला अलर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमुंबईपुणेनाशिकशेतकरीमहाराष्ट्र