मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम असून दुपारच्या वेळी तीव्र उष्णता सकाळच्या वेळी गारवा तर सायंकाळी उष्णता पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून थंड हवेमुळे तापमानात वाढलेली उष्णता काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, तापमानात चढ-उतार होताना दिसणार आहे. पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तरेकडून येत असलेल्या थंड हवेमुळे उष्णतेची तीव्रता कमी झाली असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. मुंबईत आतापर्यंत असलेले अल्हाददायक वातावरण आता उष्ण (Hot) होणार आहे. पुणे शहरामध्ये सकाळच्या वेळी धुके (Fog) पाहायला मिळत होते आता मात्र पुण्यामध्ये आज (७ फेब्रुवारी) रोजी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसांपासून कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तर आज (७ फेब्रुवारी रोजी देखील मराठवाड्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस एवढे राहील तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस एवढे राहील. नाशिकमधील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट होणार आहे. ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले नागपूरचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे तर किमान तापमान देखील १७ अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या पाण्याच्या व्यवस्थेवर लक्ष देणे आवश्यक आहे.
* भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.
* नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Upate: थंडीची माघार; उन्हाळ्याची चाहुल काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर