Join us

Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारवा तर दुपारी उकाडा जाणवणार; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 09:13 IST

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. कधी थंडी आणि गरमी असा दोन्ही अनुभव नागरिकांना मिळत आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी आणि उकाडा आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्य तापमानात मोठा बदल झाला असून कुठे थंडी (Cold) तर कुठे गर्मी (Hot)असे चित्र पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीसह तापमान देखील वाढणार आहे. तर काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. मध्य महाराष्ट्रविदर्भात तापमानात घट झाली आहे. तर कोकण मराठवाड्यात तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका अजूनही जाणवत आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील हवामानात होत आहे.  हवेत गारठा जाणवत आहे. पुढील काही दिवस हा गारठा वाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Condition of cyclonic winds) आसाम आणि त्याच्या परिसरात सक्रिय झाली असून गुजरातपासून राजस्थानसह बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) नैऋत्य भागात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे वायव्य भागात पश्चिम वाऱ्याचा झोत(west wind) वाहत असल्याने थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्राचा अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात किमान तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअसच्यादरम्यान नोंद करण्यात आली आहे. तर सांगली, सातारा आणि परभणी या भागातही किमान तापमान हे ११ ते १७ अंश सेल्सिअसच्यादरम्यान नोंदवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे.

* अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

 हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : कसे असेल आजचे हवामान; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानचक्रीवादळमहाराष्ट्रमराठवाडाविदर्भकोकण