Join us

Maharashtra Weather Update : कधी गुलाबी थंडी तर कधी उन्हाचा चटका; नक्की कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:28 IST

Maharashtra weather update : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल आहे. दिवसा आता उन्हाचा चटका बसत आहे तर रात्री ७ नंतर पहाटेपर्यंत थंडी जाणवत आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट सविस्तर

Maharashtra Weather Update :  मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल (Climate Change) आहे. दिवसा आता उन्हाचा चटका बसत आहे तर रात्री ७ नंतर पहाटेपर्यंत थंडी जाणवत आहे. त्यामुळे आता हिवाळ्यात उन्हाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

राज्यात सातत्याने हवामानात मोठे बदल होत असून, आता तापमानातही लक्षणीय चढ-उताराची नोंद केली जात आहे. सध्या मुंबईसह राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी पडते, तर दिवसा नागरिकांना उन्हाचा कडाका सहन करावा लागतोय.

ही परिस्थिती पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तविली आहे. बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिमी वाऱ्याचा (West wind) वेग वाढला असून, वायव्य भारतात याचा सर्वाधिक परिणाम होताना दिसत आहे. परिणामी उत्तर भारताच्या मैदानी क्षेत्रांमध्ये गारठा कमी असून, राज्यात मात्र दिवसभर उन्हाळा तर रात्री आणि पहाटे हिवाळा असे दोन्ही ऋतू पाहायला मिळत आहे. (IMD Forecast)

राज्यातील हवामानाची ही स्थिती फारशी बदलणार नसून, मुंबईसह उपनगरीय क्षेत्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासहविदर्भातही तापमानात (Temperature)फारसा बदल जाणवणार नाही.  

मुंबई (Mumbai) शहरासह राज्यात रत्नागिरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद केली जाऊ शकते. इतकेच नव्हे, तर राज्यातील काही भागांमध्ये याच तापमानवाढीमुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवेत गारठा कायम राहणार आहे.

शेतकऱ्यांना सल्ला* बदलत्या हवामानानुसार जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे तसेच दर पंधरा दिवसाला गोठा व गोठ्याचा परिसरात किटकनाशकाची फवारणी करावी व गोठ्यातील खड्डा व भेगा असतील तर त्या बुजवून घ्याव्यात व गोठा व गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : पश्चिम हिमालयात चक्रावात सक्रीय; काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा