Join us

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा पारा वाढतोय; हवामानात मोठ्या बदलाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 09:42 IST

Maharashtra Weather Update: राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढतोय. मंगळवारी (४ मार्च) रोजी जवळ जवळ ४ अंश सेल्सिअसने सरासरी तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (major change in climate)

Maharashtra Weather Update : राज्यात आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. वाऱ्यांची दिशाही बदलत असून अरबी समुद्रामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. (major change in climate)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रावर बदलत्या हवामानाचा परिणाम अपेक्षित आहे. ही तापमान वाढ १३ मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (major change in climate)

दरम्यानच्या काळात तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते, अशी माहिती डॉ. के. एस. होसाळीकर (माजी प्रमुख, IMD पुणे) यांनी दिली. तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर पाणी पिणे, उन्हापासून संरक्षण या गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.  

राज्यात सर्वदूर कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले जात आहे. यामध्ये कोकण विभागात सरासरीहून कमाल तापमान मोठ्या फरकाने वाढत असून दमट आणि उष्ण हवामानामुळे या विभागातील नागरिक अधिक त्रस्त आहेत. (major change in climate)

मुंबईमध्ये मंगळवारी उष्ण आणि दमट वातावरणामुळे मुंबईकर हैराण होते. सांताक्रूझ येथे सरासरीहून ३.९ अंशांनी कमाल तापमान चढे होते. या आठवड्याच्या अखेरपर्यंत कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (major change in climate)

शेतकऱ्यांना सल्ला

* काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.

* केळी, आंबा व द्राक्ष बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमुंबईकोकणविदर्भमहाराष्ट्रमराठवाडा