Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण हे सातत्याने बदलते आहे. कधी पाऊस तर कधी उष्णतेची लाट अशी परिस्थिती आहे. त्यातच बुधवारी(१६ एप्रिल) रोजी अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. (Highest temperature)
एप्रिल महिन्याच्या सुरुवातील पासून राज्यात अवकाळीचे ढग, गारपीट, पाऊसाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागात उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. (Highest temperature)
दरवर्षी एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके अधिक बसतात. मात्र, यंदा अवकाळीचा धुमाकुळ सुरू आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागात ऊन वाढताना दिसत आहे. तर काही ठिकाणी अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आज वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेत वाढ होणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये हवामान सामान्य राहिल, असे हवामान विभागाने कळविले आहे. (Highest temperature)
अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद
अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पारा ४३.७ अंश सेल्सिअसपर्यंत गेला. त्यात आता पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* वाढत्या तापमानामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : येत्या २४ तासात कसे असेल हवामान जाणून घ्या सविस्तर