Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी अवकाळीचा मारा (unseasonal weather) तर कधी उष्णतेचा पारा (Heat) चढताना दिसत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (१० एप्रिल) रोजी देशाच्या विविध राज्यांमध्ये हवामानाची वेगवेगळी स्थिती पाहायला मिळेल. राज्यात दक्षिणेकडे भागात कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र वाऱ्याचे क्षेत्र तयार होत असतानाच राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट (Heat) अधिक तीव्र होताना दिसेल.
येत्या २४ तासांमध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाचा इशारा जारी केला असून, मध्य आणि उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढताना (Heat) दिसेल. महाराष्ट्रात उष्णतेमुळे होणारी नागरिकांनी होरपळ अद्याप थांबलेली नाही.
विदर्भात सूर्य नारायाणाचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नजीकच्या भागांमध्येही उष्णतेच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे करण्यात आली असून, येथे तापमानाचा पारा ४४.१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आला आहे. राज्यात एकिकडे उष्णता रौद्र रूप धारण करत असतानाच दुसरीकडे मात्र बाष्पीभवन प्रक्रियेला वेग येत आहे.
त्यामुळे वादळी पावसाला आवश्यक अशी वातावरणनिर्मिती तयार होताना दिसत आहे. त्यामुळे विदर्भात येत्या २४ तासांसाठी अवकाळी पावसाचा (unseasonal rain) अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* मळणी केलेल्या रब्बी ज्वारी व गहू पिकाच्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
* काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: अवकाळीची धाकधुक कायम; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर