Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : किमान तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:41 IST

Maharashtra Weather Update : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत तापमानात वाढ होत असून थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात गुरूवारी (१७ जानेवारी) रोजी वाढ झालेली दिसून आली. तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत थंडीचा (Cold) जोर कमी झाला असून किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे.

पुण्यासह, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापुरातील कमाल तापमानात वाढ झाल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे.

आज (१७ जानेवारी) रोजी  पुण्यातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके राहिल. पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर ढगाळ वातावरण असेल.  तर कमाल तापमानात देखील वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

साताऱ्यामध्ये आज निरभ्र आकाश असणार आहे. साताऱ्यातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात हलकी थंडी जाणवण्याची शक्यता असून पुढील २ दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कमी होताना दिसत आहे. किमान तापमानात आता २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

* काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : आज विदर्भात येणार का पाऊस; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमहाराष्ट्रविदर्भकोकणमराठवाडा