Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरडे वारे (Dry Winds) सक्रीय झाले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. पंजाब आणि परिसरात पश्चिमी चक्रावात (Western Cyclone) सक्रीय झाला आहे. राजस्थान आणि परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत.
येत्या ४८ तासांत २-३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कमाल तापमानातही राज्यात १-३ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, पंजाब आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची (Cyclonic Winds) स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिमेकडे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील थंडी त्याचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे.
बुधवारी (२२ जानेवारी) रोजी मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानात १६-२० अंश सेल्सिअसने वाढ होत आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
* काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.