Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain : आज राज्यात कुठे किती पडणार पाऊस? 'या' ४ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी!

Maharashtra Rain : आज राज्यात कुठे किती पडणार पाऊस? 'या' ४ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी!

Maharashtra Rain Red alert of rain in these 4 districts today How much rain will fall in the state? | Maharashtra Rain : आज राज्यात कुठे किती पडणार पाऊस? 'या' ४ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी!

Maharashtra Rain : आज राज्यात कुठे किती पडणार पाऊस? 'या' ४ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी!

Maharashtra Weather Updates : आज राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Updates : आज राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Today Maharashtra Rain Updates : राज्यात मागच्या दोन आठवड्यापासून चांगला पाऊस बरसत असून जून महिन्याच्या मध्यानंतर पावसाची सरासरी काहीशी कमी झाली होती. त्यानंतर आता पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. कोकण घाटमाथ्यावर आणि विदर्भातील पूर्व भागांत चांगला पाऊस पडताना दिसत आहे. 

दरम्यान, आज (ता. १९) रोजी राज्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील अशी शक्यता आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(Maharashtra Daily Rain Updates)

मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. परंतु उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अमरावती, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Web Title: Maharashtra Rain Red alert of rain in these 4 districts today How much rain will fall in the state?