Join us

Maharashtra Rain : कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून सौराष्ट्रकडे; उद्यापासून राज्यात 'या' भागात पुन्हा मुसळधार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:12 IST

Maharashtra Rain Update : आठवड्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून सौराष्ट्रकडे आगेकूच करणार आहे.

महापुरामुळे गंभीर परिस्थिती बनलेला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा आभाळ फाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून सौराष्ट्रकडे आगेकूच करणार आहे.

परिणामी शनिवार, रविवार व सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील आतील भागात मुसळधार पाऊस होईल. तीन दिवसांत मिळून ४०० मिमी पाऊस पडेल.

२६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढेल. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत प्रमाण वाढलेलेच राहील.

तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल.

२ ते ३ ऑक्टोबरपर्यंत हीच परिस्थिती कायम असेल, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

अधिक वाचा: अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

टॅग्स :पाऊसहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजमराठवाडापूर