गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन ते चार दिवसांत म्हणजे २६ ते २९ ऑगस्टदरम्यान मुंबईसहकोकणात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
घाट भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गणेशभक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरावर पुन्हा एकदा निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून सोमवारी मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरुवात झाली.
कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तसेच पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अधिक वाचा: रब्बी ज्वारीचे बियाणे अनुदानावर मिळणार; प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य