उजनी शंभर टक्के भरले असून शनिवारी रात्री ९ वाजता उजनी शंभर टक्के भरले आहे. गतवर्षीदेखील उजनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ५ ऑगस्ट २४ रोजी शंभर टक्के भरले होते. १४ मे रोजी वजा २२.९६ टक्के पर्यंत खाली गेले होते.
या वर्षी अवकाळी पावसाने उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली होती. मे अखेरपर्यंत १५ दिवसांत उजनी पाणलोट क्षेत्रात तब्बल २५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. उजनी शंभर टक्के भरल्याने पाण्याची चिंता मिटली.
जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते. अडीच महिन्यांत २२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा आणखी दोन महिने शिल्लक असल्याने धरणातून ६० टीएमसी पाणी भीमा नदीत सोडून देण्यात आले.
१११ टक्क्यांपर्यंत उजनी धरण धरले जाते
• उजनीची क्षमता १२३ टीएमसी असून १११ टक्क्यांपर्यंत उजनी धरण धरले जाते. एकूण ११७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे, तर ५३.४४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ६३.६६ टीएमसी मृतसाठा आहे.
• धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग गेल्या सोमवारी बंद करण्यात आला होता. २५ मेपासून दौंड येथील विसर्ग कायम असून दौंड येथून उजनी धरणात ३ हजार १०२ क्युसेक विसर्ग मिसळत आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा कालावधी...
धरणाच्या इतिहासात प्रथमच मृत साठ्यात गेलेले उजनी २७ मे रोजी त्यातून बाहेर आले. तर पुढील २१ दिवसांत १७ जून रोजी ५० टक्के भरले. पावसाळा शिल्लक असल्याने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडून देण्यात आले. यामुळे उजनी शंभर टक्के भरण्यासाठी मोठा कालावधी लागला. १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाळ्याचा कालावधी समजला जातो.
कुठे किती विसर्ग
उजनी मुख्य कालवा - १ हजार ३०० क्युसेक
भीमा सीना जोड कालवा - ४०० क्युसेक
सीना माढा उपसा सिंचन - १८० क्युसेक
दहिगाव - ८० क्युसेक
हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर