Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Temperature Record : दररोज जाहीर होणारे तापमान कुठे मोजले जाते, 'ही' यंत्रे नेमकी कशी काम करतात, वाचा सविस्तर 

Temperature Record : दररोज जाहीर होणारे तापमान कुठे मोजले जाते, 'ही' यंत्रे नेमकी कशी काम करतात, वाचा सविस्तर 

Latest news Where is the temperature announced daily measured, how exactly do these devices work, read in detail | Temperature Record : दररोज जाहीर होणारे तापमान कुठे मोजले जाते, 'ही' यंत्रे नेमकी कशी काम करतात, वाचा सविस्तर 

Temperature Record : दररोज जाहीर होणारे तापमान कुठे मोजले जाते, 'ही' यंत्रे नेमकी कशी काम करतात, वाचा सविस्तर 

Temperature Record : दररोज जाहीर होणारे हे तापमान नक्की मोजले कोठे जाते आणि ही यंत्रे नेमकी कशी काम करतात.

Temperature Record : दररोज जाहीर होणारे हे तापमान नक्की मोजले कोठे जाते आणि ही यंत्रे नेमकी कशी काम करतात.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सूर्य अक्षरशः आग ओकत असून, तापमानाचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. दररोज जाहीर होणारे हे तापमान नक्की मोजले कोठे जाते आणि ही यंत्रे नेमकी कशी काम करतात, याबाबत मोठी उत्सुकता असते. यासाठी अनेक ठिकाणी या यंत्रणा कार्यान्वित असून त्या कशाप्रकारे काम करतात, ते समजून घेऊयात... 

'स्टीव्हन्सन स्क्रीन' (हवामान मापक पेटी) : 
ही पांढऱ्या रंगाची लाकडी पेटी असते. या पेटीत दिवसातील जास्तीत जास्त (कमाल) आणि कमीत कमी (किमान) तापमान मोजणारे तापमापक असतात. सूर्याचा थेट प्रकाश पडू नये आणि हवा खेळती राहावी, अशा पद्धतीने या पेटीची रचना केलेली असते. यातूनच आपल्याला दररोजचे शहराचे तापमान समजते.

'पर्जन्यमापक': 
पाऊस मोजण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. यात एका नरसाळ्यातून पावसाचे पाणी बाटलीत जमा होते. दररोज सकाळी ८:३० वाजता या जमा झालेल्या पाण्याची मोजपात्राच्या साहाय्याने नोंद घेतली जाते. पाऊस 'मिमी' मध्ये मोजला जातो.

स्टोक्स सनशाईन रेकॉर्डर : 
दिवसभरात सूर्य किती वेळ तळपला, याची नोंद हे यंत्र करते. यात एका काचेच्या गोलावर सूर्याचे किरण केंद्रित केले जातात, ज्यामुळे त्याखालील विशिष्ट पट्टीवर जळण्याची खूण उमटते. त्या खुणेवरून सूर्यप्रकाशाचा कालावधी मोजला जातो.

विंड टॉवर' : 
या टॉवरच्या सर्वात वरच्या बाजूला वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजणारी उपकरणे बसवलेली आहेत. वरच्या बाजूला जे फिरणारे कप दिसत आहेत, ते वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जातात. त्याला अॅनिमोमीटर म्हणतात, वारा जितक्या वेगाने वाहतो, तितक्या वेगाने हे कप फिरतात. त्याच टॉवरवर 'विंड व्हेन' देखील बसविण्यात आले असून, वाऱ्याची दिशा (उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम) समजण्यास याचा वापर होतो.

'मृदा तापमापक' : 
केवळ हवेचेच नाही, तर जमिनीच्या पोटातील तापमान मोजणेही शेतीसाठी महत्त्वाचे असते. जमिनीच्या आत वेगवेगळ्या खोलीवर (५, १०, २०, ३० सेमी) हे तापमापक गाडलेले असतात. पिकांची वाढ आणि जमिनीतील ओलावा तपासण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो.

Web Title : तापमान रिकॉर्ड: मौसम उपकरण कहाँ और कैसे काम करते हैं

Web Summary : स्टीवेन्सन स्क्रीन, वर्षामापी, धूप रिकॉर्डर, पवन टॉवर और मृदा थर्मामीटर जैसे मौसम उपकरण तापमान, वर्षा, धूप की अवधि, हवा की गति/दिशा और मिट्टी के तापमान को विभिन्न गहराई पर कैसे मापते हैं, इसका पता लगाएं, जो महत्वपूर्ण मौसम डेटा प्रदान करते हैं।

Web Title : Decoding Temperature Records: Where and How Weather Instruments Work

Web Summary : Explore how weather instruments like Stevenson screens, rain gauges, sunshine recorders, wind towers, and soil thermometers measure temperature, rainfall, sunlight duration, wind speed/direction, and soil temperature at various depths, respectively, providing crucial weather data.