lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कसे? वाचा हवामान अंदाज 

नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कसे? वाचा हवामान अंदाज 

Latest news weather in Nashik district for next five days? Read weather forecast | नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कसे? वाचा हवामान अंदाज 

नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कसे? वाचा हवामान अंदाज 

नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विदर्भ, मराठवाडा परिसरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाकडून पुन्हा पूर्व विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसासही गारपीटीचीही शक्यता वर्तवली आहे. मात्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मात्र सद्यस्थितीत कोरडे हवामान असून पुढील पाच दिवस देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता इगतपुरी कृषी संशोधन केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे. 

विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे व थोडे उष्ण राहण्याची शक्यता आहे. आकाश आकाश पुढील पाच दिवस निरभ्र राहील. तसेच कमाल तापमान ३५-३७ डिग्री सें. व किमान तापमान १८-२० डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग ७-१३ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

या दिवसांसाठी कृषी सल्ला 

सध्या तापमानातील वाढ लक्षात घेता पशुधानासाठी शक्यतो सावलीची व्यवस्था करावी. पशुधानातील लाळ व खुरकत या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक लस टोचुन घ्यावी. तसेच लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासुन बाजुला ठेवावे  कोरडे व उष्ण हवामान लक्ष्यात घेता दुभत्या जनावरांची तसेच पशुधन (गाय, म्हैस, शेळी व मेंढी इ. ) यांचे योग्य गोठा व्यवस्थापन, आहार नियोजन तसेच आरोग्य व्यवस्थापनावर करून उष्णतेचा ताण कमी करावा. 

तापमानाचा अंदाज लक्ष्यात घेता उन्हाळी पिकांना पाणी द्यावे. उन्हाळी मुग पिकाची पेरणी पूर्ण करावी.  उन्हाळी भुईमुग, सुर्यफुल, भेंडी इ. पिकांची लागवड रुंद सरी वाफ्यावर करावी म्हणजे पाण्याची बचत होवुन उत्पादनात वाढ होईल. मिरची व वांगी रोपे तयार झाली असल्यास रोपांची पुनर्लागवड करावी लागवडीचे वेळेस संपूर्ण खतमात्रेच्या ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. 

वेल वर्गीय पिके : वेल वाढत असताना बगलफूट आणि तणावे काढावेत, पाने काढू नयेत. वेल ५ फूट उंचीचा झाल्यावर बगलफूट काढणे थांबवावे व मंडपावर वेली वाढू द्याव्यात. म्हणजे दर्जेदार उत्पादन मिळते. उन्हाळी भेंडी काढणी एक दिवस आड करावी. रब्बी ज्वारी पिकाची काढणी म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित फुले ज्वारी काढणी यंत्राचा सहाय्याने करावी. गव्हाच्या काही जातींचे (उदा. एनआय.५४३९, फुले त्र्यंबक) दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्‍व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. उन्हात वाळवल्यानंतर मका पिकाच्या कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या (म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित अवजार) साह्याने कणसातील दाणे वेगळे करावेत. 
   
सौजन्य     
ग्रामीण कृषी मौसम नवभाग वेधशाळा विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक 

Web Title: Latest news weather in Nashik district for next five days? Read weather forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.