Join us

Maharashtra Rain Update : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण अनुकूल, कारण.... वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 18:37 IST

Maharashtra Rain Update : राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देशासह अनेक भागात पावसाची स्थिति कशी असणार? वाचा सविस्तर

Maharashtra Rain Update :   पावसासाठी (Rain) अति अनुकूल अशा खालील मुख्य प्रणाल्यातून पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि.१३ जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार, तर मराठवाड्यातील तसेच खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता (Monsoon Update) जाणवते. 

i) मान्सूनचा मुख्य आस सरासरी जागेच्या दक्षिणेकडे स्थलांतर. 

ii) अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ पश्चिम किनारपट्टी समांतर समुद्रसपाटीला हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजे द्रोणीय आकारातील तटीय (' ऑफ-शोर-ट्रफ ' ) आसा चे अस्तित्व. 

iii) अठरा डिग्री अक्षवृत्त समांतर, महाराष्ट्राच्या मध्यावरून जाणारा ३.१ ते ७. ६ किमी.उंचीवर हवेच्या साडेचार किमी. जाडीत  हवेचा कमी दाबाचा आस व त्यातून तयार झालेला वाऱ्यांचा शिअर झोन. 

iv) दक्षिण गुजरात क्षेत्रात स. सपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती. इतकेच! 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.)IMD Pune

टॅग्स :पाऊसमोसमी पाऊसहवामानमुंबई मान्सून अपडेटमहाराष्ट्र