Join us

Vidarbha Weather Update: ऑरेंज अलर्ट! विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:07 IST

Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वर्धा, ब्रह्मपुरी, नागपूर, गोंदिया, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

वर्धा, ब्रह्मपुरी, नागपूर, गोंदिया, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने विदर्भात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. मंगळवारी (२३ जुलै) वर्धा व ब्रह्मपुरीसह काही भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली  आहे.

पुढील चार दिवस म्हणजे २४ ते २७ जुलैदरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार आणि काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी पावसाचा गारवा 

मंगळवारी वर्धा येथे तब्बल ७३ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर ब्रह्मपुरीत ४१ मि.मी., चंद्रपूरमध्ये १३ मि.मी. पाऊस पडला. भंडारा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक सरी झाल्या.

नागपूरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते, परंतु पावसाचा जोर कमीच राहिला. दिवसभर उकाड्याची भावना जाणवत होती. आर्द्रतेचे प्रमाण ८५ टक्के वर पोहोचले होते, मात्र, ढगाळ हवामानामुळे तापमानात २ अंश सेल्सिअसची घट झाली आणि कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्यामुळे सायंकाळी काहीसा गारवा अनुभवास आला.

पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.तर २४ ते २६ जुलै या कालावधीत अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट जाहीर 

नागपूर : २५ जुलै

गोंदिया : २४ व २५ जुलै

भंडारा : २६ जुलै

चंद्रपूर : २४ जुलै

गडचिरोली : २४ व २६ जुलै

या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम विदर्भात किरकोळ पावसाची शक्यता 

अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता तुलनेत कमी राहील, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या भागांत केवळ तुरळक किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

मुसळधार पावसाचा विचार करून शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था, तसेच खते व कीटकनाशकांचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Rain Update : शेतकऱ्यांसाठी अलर्ट: मराठवाड्यात पाऊस आणि वादळी वारे वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रविदर्भहवामान अंदाजपाऊसअकोलावाशिमनागपूर