Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा प्रकल्प दिल्ली दरबारी; विदर्भातील शेतीला मिळणार नवे जीवन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:57 IST

Vidarbha River Linking Project : विदर्भातील पाण्याच्या समस्येवर तोडगा ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे आठ जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती ओलिताखाली येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरत आहे.(Vidarbha River Linking Project)

Vidarbha River Linking Project : विदर्भातील कोरडवाहू शेतीचे चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला आता वेग आला आहे.(Vidarbha River Linking Project)

तब्बल ९४ हजार ९३७ कोटी रुपये अंदाजित खर्च असलेला हा प्रकल्प केंद्रीय स्तरावर मंजुरीसाठी दिल्ली दरबारी पोहोचला असून, केंद्रीय जल आयोगाकडे याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.(Vidarbha River Linking Project)

राज्य शासनाकडून या प्रकल्पाला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्या कार्यालयाने अल्पावधीत प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय जल आयोगाकडे सादर केला आहे.

शेतीला मिळणार पाणी

या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या आठ जिल्ह्यांतील सुमारे ४ लाख ४ हजार २८२ हेक्टर कोरडवाहू शेती ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, उत्पादनातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

गोसेखुर्द ते नळगंगा – भव्य कालवा योजना

दर पावसाळ्यात वैनगंगा नदीतील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर तेलंगणाकडे वाहून जाते. हे पाणी अडवून त्याचा योग्य वापर करण्यासाठी या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली आहे.

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गोसेखुर्द जलाशयातून सुमारे ६३.७३ टीएमसी पाणी उचलून ते सुमारे ३८८.२८ किलोमीटर लांबीच्या आणि १०० मीटर रुंदीच्या कालव्याद्वारे नळगंगा धरणापर्यंत नेण्यात येणार आहे.

केंद्रीय मंजुरीची प्रतीक्षा

प्रस्ताव सादर झाल्यानंतर आता केंद्रीय जल आयोगाकडून सादरीकरणासाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर आवश्यक तांत्रिक आणि पर्यावरणीय मान्यता मिळाल्यास प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

विदर्भाच्या विकासाला चालना

हा प्रकल्प केवळ सिंचनासाठीच नव्हे, तर विदर्भातील शेती उत्पादन वाढवून आर्थिक विकासालाही चालना देणार आहे. 

कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प 'गेमचेंजर' ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊन शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा सविस्तर : Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला मोठी गती; 'या' ८ जिल्ह्यांचे बदलणार चित्र!

अधिक वाचा : Vidarbha River Linking Project : 'वैनगंगा-नळगंगा' प्रकल्पात बदल; कामाला गती देण्यासाठी सरकारची नवी रणनीती

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha River Linking Project: New life for Vidarbha agriculture?

Web Summary : The Wainganga-Nalganga river linking project, costing ₹94,937 crore, aims to irrigate 4.04 lakh hectares in Vidarbha. The project, now with the Central Water Commission, will transfer water from Gosikhurd to Nalganga via a 388 km canal, boosting agricultural production in eight districts.
टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीनळगंगा धरणशेतकरीशेतीविदर्भ