Vidarbha Cold Weather : विदर्भात हिवाळ्याची चाहूल आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पारा जलदगतीने घसरत असून, गोंदिया हे राज्यातील सर्वात थंड ठिकाण ठरले आहे. सोमवारी (१० नोव्हेंबर) रोजी पहाटे गोंदियात तापमान १०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा तब्बल ६.७ अंशांनी कमी आहे. (Vidarbha Cold Weather)
नागपूर, यवतमाळ, भंडारा, वाशिम, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्येही तापमान १२ ते १३ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. हवामान खात्याने पुढील ३ ते ४ दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. (Vidarbha Cold Weather)
रविवारी (९ नोव्हेंबर) रोजी गोंदियाचे किमान तापमान ११.५ अंशांवर आले होते, तर सोमवारी (१० नोव्हेंबर) रोजी पहाटे हा पारा आणखी घसरून १०.४ अंश सेल्सिअस इतका झाला. या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान म्हणून ही नोंद झाली आहे. (Vidarbha Cold Weather)
प्रमुख शहरातील तापमान
| जिल्हा | कमाल तापमान (°C) | किमान तापमान (°C) |
|---|---|---|
| अकोला | ३०.६ | १३.२ |
| बुलढाणा | २९.६ | १२.६ |
| वाशिम | २९.५ | १२.८ |
| अमरावती | ३०.८ | १२.५ |
| यवतमाळ | २९.० | १२.० |
| वर्धा | ३०.० | १३.० |
| नागपूर | २९.२ | १२.२ |
| गोंदिया | २८.२ | १०.४ |
| भंडारा | २८.० | १२.० |
| चंद्रपूर | ३०.४ | १४.६ |
| गडचिरोली | २९.२ | १४.० |
थंडीचा जोर वाढणार
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात तापमानात मोठी घसरण झाली आहे. काही ठिकाणी सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांनी कमी तापमान नोंदवले गेले आहे.
पुढील तीन ते चार दिवस ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रात्री व पहाटे थंडीचा जोर अधिक जाणवणार असून दिवसाही गारवा टिकून राहील.
लहान मुलं आणि वृद्धांची काळजी घ्या
आरोग्य विभागाने नागरिकांना थंडीपासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना उबदार कपडे वापरणे, गरम द्रवपदार्थ सेवन करणे आणि थंड हवेत दीर्घकाळ न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तापमान किती?
गोंदिया : सर्वाधिक थंड – १०.४°C
नागपूर: १२.२°C (४.७°C ने कमी)
यवतमाळ, भंडारा, अमरावती : १२°C च्या आसपास
विदर्भात पुढील ४ दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता
