Vidarbha Cold Wave : हिवाळ्याने यंदा अखेर जोर दाखवायला सुरुवात केली असून, शनिवारी नागपूरचा रात्रीचा पारा ९.६ अंशांवर घसरला. यामुळे या हंगामातील सर्वांत थंड रात्र नोंदली गेली. (Vidarbha Cold Wave)
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूर हे सर्वांत थंड शहर ठरले आहे. पुढील ४८ तासांपर्यंत गारठा कायम राहणार असून थंड लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.(Vidarbha Cold Wave)
दिवस-रात्र तापमानात लक्षणीय घट
गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू होते.
१७ नोव्हेंबरला किमान तापमान १०.५ अंश
डिसेंबरच्या सुरुवातीला तापमान १७ अंशांवर चढले
मात्र ३ डिसेंबरपासून परत घट सुरू झाली
शुक्रवारी नागपूरचा किमान पारा १०.८ अंश होता. त्यात २४ तासांत तब्बल १.२ अंशांची घसरण होऊन शनिवारी पारा ९.६ अंशांवर आला. हे तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी कमी आहे.
दिवसाचं तापमानही खाली
फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही गारवा जाणवत आहे.
शनिवारी नागरिकांना दुपारपर्यंत ऊब मिळण्याची अपेक्षा असली तरी कमाल तापमान २७.८ अंश नोंदवले गेले.
हे सरासरीपेक्षा २.३ अंशांनी कमी
विदर्भातील इतर शहरांचाही पारा खाली
नागपूर सर्वांत गार ठरले असले तरी इतर जिल्ह्यांमध्येही थंडी वाढली आहे
| शहर | किमान तापमान (°C) |
|---|---|
| नागपूर | ९.६ |
| गोंदिया | ९.८ |
| भंडारा | १० |
| यवतमाळ | १० |
| वर्धा | ११–१२ |
| वाशिम | ११–१२ |
सिझनचा सर्वांत थंड दिवस (नागपूर)
| तारीख | किमान तापमान (°C) |
|---|---|
| ६ डिसेंबर | ९.६ |
| ५ डिसेंबर | १०.८ |
| ४ डिसेंबर | ११.२ |
| १७ नोव्हेंबर | १०.५ |
| १६ नोव्हेंबर | १०.८ |
| १८ नोव्हेंबर | १०.९ |
| २९ नोव्हेंबर | ११.० |
| ३० नोव्हेंबर | ११.४ |
उत्तर भारतातील गारठ्याचा प्रभाव विदर्भावर
सध्या उत्तर भारतात जबरदस्त थंडी पडत आहे. पंजाबमधील आदमपूरचे तापमान २.२ अंशांवर नोंदले गेले. त्याच थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रातील विदर्भावरही दिसत आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
पुढील २ दिवस थंड लाट
काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी कमी
त्यानंतर हळूहळू २ अंशांची वाढ
पुढल्या आठवड्यात गारठ्यातून थोडा दिलासा मिळणार
हिवाळी अधिवेशनातही थंडीचा तडाखा
सोमवारपासून उपराजधानी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. येणाऱ्या राजकीय प्रतिनिधी व पाहुण्यांना या वाढत्या थंडीचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
