Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला हिरवा कंदील, 4 हजार 116 कोटींच्या प्रकल्पाला गती 

नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला हिरवा कंदील, 4 हजार 116 कोटींच्या प्रकल्पाला गती 

Latest news River linking Nar-Par-Girna project gets approval, project worth Rs 4,116 crore gets momentum | नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला हिरवा कंदील, 4 हजार 116 कोटींच्या प्रकल्पाला गती 

नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला हिरवा कंदील, 4 हजार 116 कोटींच्या प्रकल्पाला गती 

Nar-Par-Girna Project : नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनस्तरावरील समितीने हिरवा कंदील दिला आहे.

Nar-Par-Girna Project : नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनस्तरावरील समितीने हिरवा कंदील दिला आहे.

मालेगाव : नाशिक व जळगाव जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनस्तरावरील समितीने हिरवा कंदील दिला आहे. सुमारे ४,११६.१० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली असून, त्यास आता अधिकृत मान्यता मिळाल्याने पुढील कार्यवाहीला वेग येणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून सुमारे १०.६४ द.ल.घ.फू. पाणी उपलब्ध होणार असून, नाशिक व जळगाव जिल्ह्यांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळणार आहे. याशिवाय अंदाजे १ लाख २३ हजार ७९० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत जलसंपदा विभागाकडून सविस्तर अभ्यास सुरू असून, या टप्प्यातून आणखी २०.६६ द.ल.घ.फू. पाणी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे लवकरच संबंधित मंत्री, स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

 

 दहावीचा निकाल लवकरच, अकरावी ॲडमिशनसाठी कुठली कागदपत्रे लागतात, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!

 

Web Title : नार-पार-गिरना नदी परियोजना को हरी झंडी: ₹4116 करोड़ की स्वीकृति

Web Summary : नाशिक और जलगांव के लिए महत्वपूर्ण नार-पार-गिरना नदी जोड़ परियोजना को मंजूरी मिली। ₹4116 करोड़ की इस परियोजना का उद्देश्य पेयजल प्रदान करना और 1.23 लाख एकड़ भूमि की सिंचाई करना है। जल्द ही कार्यादेश; शिलान्यास समारोह की योजना है।

Web Title : Green Light for Nar-Par-Girna River Project: ₹4116 Crore Boost

Web Summary : The Nar-Par-Girna river linking project, crucial for Nashik and Jalgaon, gets approval. The ₹4116 crore project aims to provide drinking water and irrigate 1.23 lakh acres. Work order soon; a foundation stone ceremony is planned.