Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Gangapur Dam : पावसाचा जोर पुन्हा वाढला, गंगापूर धरण 97 टक्के भरले, विसर्ग सुरूच 

Gangapur Dam : पावसाचा जोर पुन्हा वाढला, गंगापूर धरण 97 टक्के भरले, विसर्ग सुरूच 

Latest news Rains increase again, Gangapur dam 97 percent full, discharge continues | Gangapur Dam : पावसाचा जोर पुन्हा वाढला, गंगापूर धरण 97 टक्के भरले, विसर्ग सुरूच 

Gangapur Dam : पावसाचा जोर पुन्हा वाढला, गंगापूर धरण 97 टक्के भरले, विसर्ग सुरूच 

Gangapur Dam : नाशिक शहर व परिसराची तहान भागविणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) ९७.१० टक्के इतके भरले.

Gangapur Dam : नाशिक शहर व परिसराची तहान भागविणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) ९७.१० टक्के इतके भरले.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : शहर व परिसराची तहान भागविणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) रविवारी ९७.१० टक्के इतके भरले. ५४६७ दलघफू इतका जलसाठा धरणात आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने सकाळी ११ वाजता पुन्हा ६९८ क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता विसर्ग ९९० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता.

नाशिक शहर व परिसरात पावसाने (Rain Update) उघडीप दिली असून तुरळक व मध्यम सरींचा अधूनमधून रविवारी वर्षाव सुरू होता. शहरात दुपारनंतर लख्ख ऊन पडले होते. तसेच गंगापूर धरणातून शनिवारी दुपारी बारा वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. कारण गुरुवारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पाणलोट क्षेत्रात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. 

यामुळे धरणात पाणलोटक्षेत्रातून वेगाने पूर पाण्याची आवक होऊ लागल्यामुळे आणि धरण जवळपास पूर्ण भरल्याने सकाळी अकरा वाजेपासून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला. सायंकाळपर्यंत दोन टप्प्यात विसर्गात वाढ करण्यात आली. यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीतदेखील काही प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वरमध्ये ३९, आंबोलीमध्ये ३०, गौतमी गोदावरीमध्ये ८, कश्यपीमध्ये १४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.

गणेश चतुर्थीपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार
गणेश चतुर्थीपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य बघता सह्याद्रीच्या कुशीतील नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढू शकतो.

Maharashtra Rain : पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होतंय, ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात कुठे-कुठे पाऊस 

Web Title: Latest news Rains increase again, Gangapur dam 97 percent full, discharge continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.