Nimna Dudhana Prakalpa : मागील दोन ते तीन दिवसांपासून परतूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. (Nimna Dudhana Prakalpa)
धरणात सध्या ४८.६६ टक्के जिवंत साठा असल्याने, परतूर, सेलू, मंठा या भागात पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या गरजा भागणार आहेत. (Nimna Dudhana Prakalpa)
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर चांगला असल्याने, नद्या आणि नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. गेल्यावर्षी फक्त १७ टक्के साठा असताना यावर्षी तो तिपटीने वाढून ४८ टक्क्यांवर पोहोचल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.(Nimna Dudhana Prakalpa)
या धरणातून अनेक गावांना 'वॉटर ग्रीड योजना' अंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा कमी होतील, असा अंदाज आहे.(Nimna Dudhana Prakalpa)
धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि धरणाची पूर्ण क्षमतेने साठवण न होणं, ही दोन मोठी अडचणी कायम आहेत. सध्या धरणाची क्षमता फक्त ७५ टक्के वापरण्यापुरती मर्यादित आहे. त्यामुळे अतिरिक्त पावसामुळे येणारे पाणी यंदाही काही प्रमाणात सोडावे लागणार आहे.(Nimna Dudhana Prakalpa)
धरणात वाढलेला साठा परतूर तालुक्यासाठी दिलासादायक असला, तरी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. शासनाने पुनर्वसनासोबतच धरणाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या योजना आखाव्यात, अशी मागणी होत आहे.(Nimna Dudhana Prakalpa)
४८ टक्के जिवंत पाणीसाठा
या धरणात पाणीसाठा वाढल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. परतूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना निम्न दुधना प्रकल्पावर अवलंबून आहेत. धरणात पाणी पातळी समाधानकारक असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.