lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > Nashik Weather Update : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान कसं राहील? वाचा सविस्तर 

Nashik Weather Update : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान कसं राहील? वाचा सविस्तर 

Latest News Nashik Weather Update How will the temperature be in Nashik district for the next five days | Nashik Weather Update : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान कसं राहील? वाचा सविस्तर 

Nashik Weather Update : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान कसं राहील? वाचा सविस्तर 

सध्या राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून नाशिक जिल्ह्यातही उन्हाची काहिली झाली आहे.

सध्या राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून नाशिक जिल्ह्यातही उन्हाची काहिली झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून नाशिक जिल्ह्यातही उन्हाची काहिली झाली आहे. पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान उष्ण राहण्याची शक्यता असून आकाश पुढील पाच दिवस निरभ्र राहील. तर कमाल तापमान ३८-३९ डिग्री सें. व किमान तापमान २४-२६ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग १४-१८ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्राने वर्तवली आहे. 

राज्यभरात उष्णतेची लाट असून उन्हाच्या दाहकतेमुळे सर्वसामान्यांबरोबर जनावरांना देखील त्रास होऊ लागला आहे. त्यातच यंदा तापमान चांगलंच वाढले असल्याने शेतीपिकांना देखील याचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून पुढील पाच देखील हवामान उष्ण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जवळपास 38 ते 39 सेल्सिअस इतके तापमान राहणार असल्याचे संकेत विभागीय संशोधन केंद्राने दिले आहे. 

हवामानावर आधारित कृषीसल्ला 

वाढते तापमान लक्ष्यात घेता उन्हाळी भाजीपाला व फळबागांना शक्यतो सायंकाळी वारंवार व हलके ओलीत करावे व पिकामध्ये आच्छादनाचा वापर करावा तसेच जनावरांचे उष्णतेपासून संरक्षणासाठी गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्ष्यात घेता उन्हाळी भाजीपाला व फळबागांना शक्यतो सायंकाळी वारंवार व हलके ओलीत करावे तसेच पिकामध्ये अच्छादनाचा वापर करावा. साठवण करावयाच्या कडधान्यांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ३ ते ५ मि.ली. एरंडेल/जवस/करंज/कडुनिंबाचे तेल प्रति किलो धान्य या प्रमाणात वापरावे. 

उन्हाळी हंगामात कृत्रिम किंवा जैविक आच्छादनांचा वापर करावा. शक्यतो जैविक आच्छादनांसाठी पालापाचोळा, गव्हाचा भुसा इत्यादीचा वापर करावा. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लास्टिक जाळीचा वापर पिकांवर करावा. झाडावरील जुनी, रोगटपाने, रोगग्रस्त फळे आणि फांद्या काढून शेताच्या बाहेर टाकाव्यात.  फुल अथवा फळगळ कमी करण्यासाठी १० ते २० पीपीएम तीव्रतेचे एन. ए. ए. या संजीवकाची १ ते २ वेळा फवारणी करावी. 

जनावरांसाठी कृषी सल्ला 

जनावरांना गोठयामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे. गोठयाच्या छपरावर गवत, पाला पाचोळा टाकून पाणी शिंपडावे त्यामुळे गोठा थंड राहातो. दुपारच्या प्रहरी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यासारखी पोषक वैरण दयावी. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते. प्राण्यांना सावलीत ठेवा आणि पिण्यास भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या.त्यांच्या कडून सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० दरम्यान काम करून घेऊ नये. गवताच्या मदतीने शेडचे छप्पर  झाकून ठेवावे, तापमान कमी करण्यासाठी त्यास पांढरा रंग द्यावा किंवा शेण- चिखलसह थर द्यावा. जनावरांना चा-यांची कमतरता असल्यास गव्हाच्या काडावर तज्ञांच्या सल्ल्यानुसार युरीयाची प्रक्रिया करुन जनावरांना खाऊ घालावे. त्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त पर्यायी स्निग्ध पूरक खाद्य, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त द्रावण.
    
 सौजन्य     
 
ग्रामीण कृषी मौसम सेवा            
 कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,           
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 
ता. इगतपुरी, जि. नाशिक 

Web Title: Latest News Nashik Weather Update How will the temperature be in Nashik district for the next five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.