Nashik Rain : कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज (IBF) अंदाज आणि इशारा लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात (Nashik Yellow Alert) काही ठिकाणी व घाट प्रक्षेत्रात काही भागात (येलो अलर्ट) दि. ३१ मार्च व ०२ एप्रिल २०२५ रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा ४०-५० किमी प्रतितास वेगासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची Mahashtra Weather Alert) होण्याची शक्यता आहे.
एकीकडे राज्यात पुढील दहा दिवस अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यात नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी व घाट प्रक्षेत्रात काही भागात (येलो अलर्ट) ०१ एप्रिल २०२५ रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा ५०-६० किमी प्रतितास वेगासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी व घाट प्रक्षेत्रात काही भागात घाट प्रक्षेत्रात काही भागात दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता परिस्थीतीच्या अनुषंगाने कृषी क्षेत्रावर पडणाऱ्या प्रभावा आधारित अंदाज आज रोजी आर एम सी मुंबईव्दारे जारी करण्यात आला आहे.
हवामानावर आधारित सामान्य सल्ला
- परिपक्क झालेल्या रब्बी पिकांची लवकरात लवकर काढणी/कापणी करून सुरक्षित जागेवर ठेवा.
- कापणी/मळणी केलेल्या पिकांना ताडपत्रीने झाकून ठेवावे.
- मेघ गर्जनेच्या पार्श्वभूमीवर, फळबागांना आणि भाजीपाला मध्ये आधार आणि यांत्रिक सहाय्य द्यावे.
- प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा.
- गारपीट/ सोसाटपाचा वाऱ्यापासून होणाऱ्या संभाव्य नुकसान टाळण्याकरीता उपायोजना कराव्यात.
- जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.
- पावसाचा अंदाज घेवूनच पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी.
पशुधनासाठी सल्ला
- प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेतीव्या उपकरणांपासून दूर ठेवा.
- आपल्या प्राण्यांना झाडाखाली जमू देऊ नका.
- प्राण्यांकडे लक्ष्य ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करा.
- दुभत्या जनावरांना गोठ्यात ठेवा.
- मेघगर्जनेसह वादळ व पावसापासून पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक / ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील दहा दिवस अवकाळीचे वातावरण कशामुळे? वाचा सविस्तर