Lokmat Agro >हवामान > Nashik Rain Update : २६ आणि २७ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता? वाचा सविस्तर 

Nashik Rain Update : २६ आणि २७ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता? वाचा सविस्तर 

Latest News Nashik Rain Update Chance of rain in Nashik district on December 26 and 27 Read in detail | Nashik Rain Update : २६ आणि २७ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता? वाचा सविस्तर 

Nashik Rain Update : २६ आणि २७ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता? वाचा सविस्तर 

Nashik Rain Update : गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह (Cloudy Weather) गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.

Nashik Rain Update : गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह (Cloudy Weather) गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Nashik Rain Update :  गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह (Cloudy Weather) गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. शिवाय राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) तसेच जिल्ह्यातील घाट क्षेत्रात २६ डिसेंबर २०२४ रोजी हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. 

एकीकडे वातावरणामुळे रब्बी पिकांवर (Rabbi Crops) परिणाम होण्याची शक्यता असताना दुसरीकडे पावसाचे वातावरण आजूबाजूला आहे. अशा स्थितीत नाशिक जिल्ह्यात २६ आणि २७ डिसेंबर २०२४ रोजी जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (४० ते ५० किमी प्रति तास वेग) वाहण्याची दाट शक्यता आहे. 

मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक 26 आणि 27 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील घाट क्षेत्रात काही ठिकाणी (येलोअलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (३० ते ४० किंवा ४० ते ५० किमी प्रति तास वेग) वाहण्याची दाट शक्यता आहे.

अशी घ्या काळजी 
पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यापासून भाजीपाला फळबागेचे रक्षण करावे. तसेच शक्य असल्यास भाजीपाला व फळबागेत हेलनेटचा उपयोग करावा व भाजीपाला पिकांना सोसाट्याचा वाऱ्यापासून संरक्षण देण्यासाठी बांबूचा आधार द्यावा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटचा अंदाज लक्ष्यात घेता, स्वतःचे तसेच पशुधनाचे पाऊस व विजांपासून संरक्षण करावे.

Maharashtra Weather Update : 'या' जिल्ह्यांत पाऊस, गारपिटीची शक्यता, वाचा आठवड्यातील हवामान अंदाज

Web Title: Latest News Nashik Rain Update Chance of rain in Nashik district on December 26 and 27 Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.