Nashik Rain Alert : पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दि. २७ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. कमाल तापमान २८-३० डिग्री सें. व किमान तापमान २१-२२ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वावाऱ्याचा याचा वेग ९-१५ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा तसेच घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे. दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी (येलो अलर्ट) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्याच्या एक-दोन ठिकाणी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे. दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्ह्याच्या एक-दोन ठिकाणी (ऑरेंज अलर्ट) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
तसेच घाट क्षेत्रातील काही ठिकाणी (ऑरेंज अलर्ट) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी (ऑरेंज अलर्ट) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या एक-दोन ठिकाणी (येलो अलर्ट) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी