Nashik Rain Alert : पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. ०३ ते ०७ मे २०२५ दरम्यान नाशिक जिल्हा व (Nashik Weather Update) जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात हलक्या पावसाची शक्यता (Rain Alert) आहे.
उर्वरित दिवस हवामान उष्ण व कोरडे राहील. कमाल तापमान ३७-४१ डिग्री सें. व किमान तापमान २४-२७ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग ७-१७ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
हवामानाचा अंदाज आणि चेतावणी लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात (Nashik District) तसेच घाट क्षेत्रात काही ठिकाणी दि. ०३ ते ०५ मे २०२५ दरम्यान (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे.
तसेच दि. ०६ मे २०२५ रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता परिस्थितीच्या अनुषंगाने कृषी क्षेत्रावर पडणाऱ्या प्रभावा आधारित अंदाज मुंबईव्दारे जारी केलेल्या जिल्हास्तरीय अंदाज आणि चेतावणीवर आधारित देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना काय आवाहन ?
- दि. ०४ ते ०७ मे २०२५ दरम्यान घाट क्षेत्रात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता सल्ला देण्यात येतो, कि पशुधनाचे व स्वतःचे संरक्षण करा. जोराचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने भाजीपाला व फळपिकांना काठीचा आधार द्यावा.
- फळमाशी ही प्लांट क्वारंटाईन पेस्ट असल्याने तिच्या नियंत्रणाकरिता कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने फेरोमन ट्रॅपचा वापर करून फळमाशीच्या नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या लेबल क्लेम औषधांचा वापर करून नियंत्रण करणे.
- मेघगर्जनेसह वादळ व पावसापासून पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक/ ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे.
- दुभत्या जनावरांना गोठयामध्ये ठेवा.
- जर शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परीसरातील सर्वात उंच वस्तू टाळा.
- जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे उघड्यावर दबा धरून बसावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी