Gangapur Dam : गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain) पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणांची पाणी पातळी स्थिर असल्याचे चित्र आहे. आजमितीस जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये जवळपास ६८.५५ टक्के जलसाठा असून मागील वर्षी हा जलसाठा १५.९७ टक्के इतका होता.
आज १५ जुलैपर्यंत गंगापूर धरणात (Gangapur Dam) ५८.७७ टक्के, धरणात ८२.६७ टक्के तर आळंदी धरणामध्ये १०० टक्क्यांवर आहे. तसेच पालखेड धरण समूहातील पालखेड धरणात ६८.९१ टक्के वाघाड धरणात ८९.५ टक्के जलसाठा आहे.
तसेच ओझरखेड धरणात ६८.८ टक्के, पुणेगाव धरणात ७४.९६ टक्के तसेच इगतपुरी तालुक्यात तालुक्यातील दारणा धरणात ६८.८ टक्के, भावली धरण १०० टक्के, मुकणे धरण ८१.२७ टक्के, वालदेवी धरण १०० टक्के तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात ९८.४४ टक्के इतका जलसाठा आहे.
तसेच गिरणा खोरे धरण समूहातील चणकापूर धरण ४५.७८ टक्के, हरणबारी आणि कर्जदार धरण १०० टक्के, गिरणा धरण ५२.१५ टक्के तर माणिकपुंज ५५.२९ टक्क्यांवर आहे. जिल्ह्यातील २६ प्रकल्पांपैकी सहा धरणे १०० टक्के भरली आहेत.