Marathwada Weather Update : मराठवाड्यात पुढील काही दिवस प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Marathwada Weather Update)
IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (Regional Meteorological Centre Mumbai) येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. (Marathwada Weather Update)
मात्र, १३ व १४ मार्च रोजी काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Marathwada Weather Update)
अंदाजानुसार, १३ मार्च रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यात तसेच मराठवाड्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. तर १४ मार्च रोजी लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
तापमानात वाढीचा अंदाज
मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील पाच दिवसांत किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
१३ ते १९ मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी
विस्तारित अंदाजानुसार (ERFS) १३ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. याच काळात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
पुढील काही दिवस मराठवाड्यात कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता असून, काही भागात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार शेती व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पिके, फळबाग, भाजीपाला व फुलपिकांसाठी आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* हलक्या पावसाची शक्यता असल्याने काढणीस तयार असलेल्या पिकांची लवकर काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
