Marathwada Dam Water Level : मराठवाड्यात पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही. नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी धरणात शुक्रवारी ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. (Marathwada Dam Water Level)
मात्र, मराठवाड्यातील इतर लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये स्थिती चिंताजनक आहे. सुमारे निम्म्याहून अधिक प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. (Marathwada Dam Water Level)
प्रकल्पांची स्थिती कशी?
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ७६ मध्यम प्रकल्पांपैकी ५ प्रकल्प पूर्णपणे कोरडे असून, तब्बल ३५ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. (Marathwada Dam Water Level)
जिल्हानिहाय प्रकल्पांची स्थिती
जिल्हा | कोरडे (जोत्या खाली) | २५% पेक्षा कमी | २५% ते ५०% | ५०% ते ७५% | ७५% पेक्षा जास्त |
---|---|---|---|---|---|
छत्रपती संभाजीनगर | ०२ | १७ | १७ | १३ | ०१ |
जालना | ०७ | ०७ | ३५ | ०३ | ०० |
बीड | ०० | १९ | ३९ | ०४ | २२ |
लातूर | ०० | ०४ | ५५ | १२ | ४२ |
धाराशिव | ०४ | २६ | २१ | ०१ | ०७ |
नांदेड | ०० | १६ | ०९ | ३६ | १६ |
परभणी | ०० | १९ | ०० | १६ | ०१ |
हिंगोली | ०० | ०८ | २५ | ०१ | ०० |
जायकवाडीचा दिलासा
जायकवाडी प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, मराठवाड्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्यासच या भागाला मोठा दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.