Lokmat Agro >हवामान > Manjara Dam Water Storage : मांजरा-रेणा प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडे; नदीकाठच्या गावांना अलर्ट!

Manjara Dam Water Storage : मांजरा-रेणा प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडे; नदीकाठच्या गावांना अलर्ट!

latest news Manjara Dam Water Storage: 6 gates of Manjara-Rena project open; Alert to villages along the river! | Manjara Dam Water Storage : मांजरा-रेणा प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडे; नदीकाठच्या गावांना अलर्ट!

Manjara Dam Water Storage : मांजरा-रेणा प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडे; नदीकाठच्या गावांना अलर्ट!

Manjara Dam Water Storage : लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मांजरा आणि रेणा प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने प्रशासनाने ६ दरवाजे उघडून हजारो क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असला तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Manjara Dam Water Storage : लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मांजरा आणि रेणा प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने प्रशासनाने ६ दरवाजे उघडून हजारो क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असला तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Manjara Dam Water Storage : लातूर जिल्ह्यातील मांजरा आणि रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातीलपाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मांजरा प्रकल्पातून मोठा विसर्ग

२८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजता मांजरा धरणाचे १ ते ६ वक्र दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटरने उघडण्यात आले. या दरवाजांतून सध्या १०,४८२.८४ क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रेणा प्रकल्पाचे दरवाजेही उघडले

रेणापूर मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने २८ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता धरणाचे ६ दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या या दरवाजांतून ३,७५५.२१ क्युसेक (१०६.३५ क्युमेक) पाणी रेणा नदीपात्रात विसर्ग होत आहे. पाऊस सुरू राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

नदीकाठच्या गावांना इशारा

दोन्ही प्रकल्पांतून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्राचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब

धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाण्याचा पुरवठा सुधारेल तसेच पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होईल. पाऊस कमी झाल्यानंतर दरवाजे बंद केले जातील, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा (टक्केवारीत)

तावरजा – ८३.७० टक्के

रेणा – १०० टक्के

व्हटी – ९१.६३ टक्के

तिरू – १०० टक्के

देवर्जन – ५४.७६ टक्के

साकोळ – ६०.३७ टक्के

घरणी – ७९.३७ टक्के

मसलगा – १७.२० टक्के

हे ही वाचा साविस्तर : Manjara Dam Water Storage : मांजरा प्रकल्पाचे दरवाजे उघडले; किती क्यूसेक विसर्ग होतोय वाचा सविस्तर

Web Title: latest news Manjara Dam Water Storage: 6 gates of Manjara-Rena project open; Alert to villages along the river!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.