Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे तापमान झपाट्याने वाढत असताना देशभरात हवामानात मात्र बदल सुरूच आहे.(Maharashtra Weather Update)
उत्तर भारतात वादळी वारे, पाऊस आणि गारठा परतताना दिसत असतानाच महाराष्ट्रात मात्र उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तविण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
देशभरात वादळ, पाऊस आणि गारठ्याची पुनरागमन
मार्च महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि लडाख या भागांमध्ये पावसासह हिमवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे.
या भागांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला असून, वादळी परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वोत्तर भारतातही मेघगर्जनेसह पावसासाठी अनुकूल स्थिती असून, मध्य भारतात तापमानात काही प्रमाणात घट नोंदवली जात आहे.
महाराष्ट्रात उष्ण-दमट हवामान
राज्यात मात्र चित्र वेगळंच आहे. राज्यात पुन्हा तापमान वाढू लागले असून, कोकण पट्ट्यात उष्णता आणि दमटपणा जाणवणार आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांसह किनारपट्टीवर उष्ण-दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक सरींचा अंदाज आहे.
आंध्र प्रदेशच्या सीमाभागात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम विदर्भ आणि दक्षिण भारतावरही होत आहे. त्यामुळे काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.
पुढील ४८ तास महत्त्वाचे
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ ते ४८ तास देशभरात हवामान अस्थिर राहणार आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता असून, तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते.
मात्र महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका वाढणार असल्याने नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडणे टाळावे, असा इशाराही देण्यात आला आहे.
मार्च अखेरपर्यंत संमिश्र हवामान
२९ मार्चच्या सुमारास आणखी एक पश्चिमी झंझावात सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात संमिश्र हवामानाने होणार आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हवामान अनुभवायला मिळणार असून, उष्णता, पाऊस आणि वादळ यांचा संगम पाहायला मिळेल.
देशात वादळ, पाऊस आणि गारठा परतताना दिसत असला तरी महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे. काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी एकूणच उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
Web Summary : While North India sees storms, Maharashtra anticipates hot, humid weather. Coastal areas face a yellow alert. South Maharashtra and Marathwada may experience light rain. High temperatures pose a heatstroke risk.
Web Summary : उत्तरी भारत में तूफान, महाराष्ट्र में गर्म, आर्द्र मौसम का अनुमान है। तटीय क्षेत्रों में येलो अलर्ट। दक्षिण महाराष्ट्र और मराठवाड़ा में हल्की बारिश संभव है। उच्च तापमान से हीटस्ट्रोक का खतरा है।