Maharashtra Weather Update : देशातील इतर राज्याबरोबर महाराष्ट्रात (Maharashtra) एप्रिलच्या पहिल्या आठवडयात अवकाळीचे वातावरण तयार (Unseasonal rain) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमके कारण काय आहे? याबाबत जेष्ठ निवृत्त हवामान शास्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.
तर ‘एमजेओ’ ची सायकल, अद्याप भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेशली नसला तरी, बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे पण भूभागावर महाराष्ट्रपर्यंत येताच नैऋक्तकडून ईशान्येकडे दिशा घेणारे तसेच उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे ईशान्येकडून नैऋक्तकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांच्या संगमातून व त्यातून समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ऊंचीपर्यंत महाराष्ट्र ते ओरिसा राज्यादरम्यान तयार झालेला कमकुवत हवेच्या कमी दाबाचा आस यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवडयात इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही अवकाळीचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच्या परिणामातून आजपासून दहा दिवस म्हणजे सोमवार दि. ७ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ तसेच गडगडाटीचे वातावरण राहण्याची शक्यता असून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते.
विशेषत: मंगळवार व बुधवार दि. १ व २ एप्रिलला ह्या वातावरणाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे ह्या दोन दिवसात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते. दरम्यानच्या काळात वातावरणात काही बदल झाला तर खुलासा करता येईल.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.