Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी चेहरा पाहायला मिळत आहे. सध्या सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि वेस्टर्न डिस्टबन्स (Western Disturbance) च्या प्रभावामुळे हवामानात मोठी उलथापालथ झाली आहे. (Maharashtra Weather Update)
उकाडा आणि वादळी पावसाचा हा दुहेरी फटका नागरिक आणि शेतकरी दोघांसाठीही चिंतेचा विषय ठरत आहे. पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, एका बाजूला मुंबईसह कोकण पट्ट्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वाढली आहे. पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.(Maharashtra Weather Update)
हवामानात अचानक बदलाचे कारण
हवामान तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणारे गरम वारे आणि त्याचवेळी तयार झालेले सायक्लोनिक सर्क्युलेशन यामुळे वातावरण अस्थिर झाले आहे. तसेच वेस्टर्न डिस्टबन्स (Western Disturbance) मुळे उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
कुठे काय स्थिती?
मुंबई व उपनगर : प्रचंड उकाडा, दमट हवामान; नागरिक घामाघूम
विदर्भ : आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, विजांचा कडकडाट
मराठवाडा : जालना, परभणी, बीड भागात पावसाच्या सरी
पश्चिम महाराष्ट्र : बारामती, सोलापूर परिसरात अचानक पाऊस आणि वादळी वारे
कोकण वगळता राज्यभर : २९ मार्चपासून मुसळधार पावसाचा इशारा
पुढील ३ दिवसांचा अंदाज
IMD च्या माहितीनुसार, ३०, ३१ मार्च आणि १ एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत जाऊ शकतो.
तापमानात चढ-उतार
हवामान विभागानुसार, पुढील २४ तासांत किमान तापमानात ३-४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात तात्पुरती वाढ होऊन त्यानंतर पुन्हा घट होईल.
नागरिकांसाठी इशारा
* घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवा.
* वादळी वाऱ्यामुळे उंच झाडे व विजेच्या खांबांपासून दूर रहा.
* विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी थांबा.
* अनावश्यक प्रवास टाळा.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* पिकांचे तात्काळ संरक्षण (आच्छादन/निचरा व्यवस्था) करा.
* कापणीस तयार पिके लवकर काढून सुरक्षित ठेवा.
* जनावरांना सुरक्षित आश्रय द्या.
अधिक वाचा : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!
Web Summary : Maharashtra's weather is under scrutiny. Keep an eye on developing conditions. Stay updated on the latest forecasts for your region. Be prepared for potential changes and adhere to any advisories issued by local authorities. Stay informed about shifts in weather patterns across Maharashtra.
Web Summary : महाराष्ट्र के मौसम पर कड़ी नजर रखी जा रही है। मौजूदा हालातों पर ध्यान रखें। अपने क्षेत्र के लिए नवीनतम पूर्वानुमानों से अपडेट रहें। संभावित परिवर्तनों के लिए तैयार रहें और स्थानीय अधिकारियों द्वारा जारी किसी भी सलाह का पालन करें। महाराष्ट्र में मौसम के बदलाव के बारे में जानकारी रखें।