Maharashtra Weather Update : राज्यात ऑक्टोबर महिन्यातही पावसाच्या सरींची पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. साधारणपणे या काळात आकाश निरभ्र राहून काढणीला पोषक वातावरण असते. (Maharashtra Weather Update)
मात्र, यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही हवामानात अस्थिरता कायम असून, मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही संपूर्णपणे माघार घेतलेला नाही.(Maharashtra Weather Update)
राज्यभरात ढगाळ वातावरण
हवामान विभागाने पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ ते ४८ तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अलर्ट जिल्हे: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग.
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाट क्षेत्र तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव व परभणी परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
समुद्रातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
सध्या त्याची तीव्रता कमी असली तरी पुढील २४ तासांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर या प्रणालीचा अप्रत्यक्ष परिणाम दिसून येईल.
या परिस्थितीचा परिणाम
कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढणार,
सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर परिसरात हलक्या सरींचा जोर वाढण्याची शक्यता,
मध्य महाराष्ट्रात दमट वातावरण कायम राहील.
ढगाळ वातावरणामुळे दिवसा उष्मा वाढतो तर रात्री ओलसरपणा जाणवतो. शहरी भागात हीट ट्रॅपिंग होत असून उकाडा असह्य झाला आहे. ग्रामीण भागात सकाळी गारवा जाणवतो, पण दुपारी उष्णता वाढल्याने शेतातील कामात त्रास होत आहे.
डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. तज्ज्ञांनी हायड्रेटेड राहण्याचा आणि थेट उन्हात काम टाळण्याचा सल्ला दिला आहे.
पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे
हवामान विभागाने काढलेल्या अंदाजानुसार, कोकणात हलक्या ते मध्यम सरींचा संभव
सातारा, कोल्हापूर, सांगली घाट परिसरात मेघगर्जनेसह पाऊस
विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस
या काळात 'ऑक्टोबर हीट' आणि 'दमट वातावरण' यांचा संगम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
सध्या सुरू असलेला ऑक्टोबर महिना थंडीची चाहूल देणारा असावा अशी अपेक्षा असताना, या वर्षी तो 'अवकाळी आणि उकाड्याचा महिना' ठरत आहे.
राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून काढणी, साठवणूक आणि थ्रेशिंग या प्रक्रियेत सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा स्पष्ट सल्ला हवामान विभाग आणि कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
काढणी काळजीपूर्वक करा
पीक सुकवणी व साठवणूक सुरक्षित ठिकाणी करा.
थ्रेशिंग प्रक्रिया पुढे ढकला.
ओलसर शेतात यंत्र वापर टाळा.
पेरणी नियोजन करताना हवामानाचा अंदाज बघा.
Web Summary : Maharashtra anticipates fluctuating weather. Stay updated on potential rainfall, temperature shifts, and overall climate changes across the state. Be prepared for possible weather impacts.
Web Summary : महाराष्ट्र में मौसम बदलने की संभावना है। संभावित बारिश, तापमान में बदलाव और राज्य भर में समग्र जलवायु परिवर्तनों पर अपडेट रहें। संभावित मौसम प्रभावों के लिए तैयार रहें।