Maharashtra Weather Update : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने आज २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. (Maharashtra Weather Update)
कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या परिसरांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाचा सिलसिला सुरू आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
राज्यात पुढील २४-४८ तासांत पावसाचा जोर वाढणार आहे.खालीलप्रमाणे विभागवार यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
कोकण विभाग
हलका ते मध्यम पाऊस : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड
जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पश्चिम महाराष्ट्र
वादळी वारे, विजांचा कडकडाट व पाऊस : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे घाटमाथा
मराठवाडा
हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस : छत्रपती संभाजीनगर, जालना
वादळी वारे व विजांसह पाऊस : परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
उत्तर महाराष्ट्र
हलका पाऊस : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव
वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता : अहमदनगर
विदर्भ
वादळी वाऱ्यांसह पाऊस : नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ
पावसाने विश्रांती घेतलेले भाग : अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* राज्यात पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
* फवारणीचे काम पुढे ढकलावे.
* शेतातील निचऱ्याची व्यवस्था करून पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.