Join us

Maharashtra Weather Update : आजचा दिवस पावसाचा; राज्यात २८ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 09:35 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज (२९ ऑगस्ट) रोजी राज्यातील तब्बल २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट आणि काही घाटमाथा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update)

आज (२९ ऑगस्ट) रोजी राज्यातील तब्बल २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट आणि काही घाटमाथा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील २४ तास नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचा दिवस ठरणार असून अनेक जिल्ह्यांत यलो तर घाटमाथा व कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

मराठवाड्यात ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मराठवाड्यात पावसाची तीव्रता वाढली असून आज (२९ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांत अंशत: ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

कोकण विभागात यलो अलर्ट

मुंबई : मध्यम पावसाची शक्यता.

पालघर, ठाणे : विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : मुसळधार पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या  जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल तर पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर  या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

अकोला, अमरावती या जिल्ह्यात मुसळधार पाऊस; विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहतील.

भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

नागरिकांना आवाहन

* पुढील २४ तास राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

* काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जलसाठा वाढ, पूरस्थिती किंवा वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ शकतात.

* नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती काळजी घ्यावी.

शेतकऱ्यांना सल्ला 

* मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारखी खरीप पिके पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. शेतात पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था (ड्रेनेज) करा.

* पिकांवर रोग व कीड फैलावू शकतो, त्यामुळे शेताची नियमित पाहणी करावी.

* विजांच्या कडकडाटाच्या वेळी शेतात न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : IMD अलर्ट : कोणत्या जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस? वाचा सविस्तर