Join us

Maharashtra Weather Update : नारळी पौर्णिमेला पावसाची हजेरी; विजांच्या कडकडाटासह सरींचा अंदाज वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:45 IST

Maharashtra Weather Update : राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नारळी पौर्णिमेच्या (Narali Purnima) पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार (Narali Purnima) असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नारळी पौर्णिमेच्या (Narali Purnima) पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

पावसाचं दमदार पुनरागमन

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आज (8 ऑगस्ट) महाराष्ट्रात विविध भागांमध्ये मिश्र स्वरूपाचे हवामान राहणार आहे. पावसाचा जोर कायम राहून, काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाचा जोर आणि समुद्रात उधाण

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या  जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई व पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून रिमझिम सरी सुरू असून, २४ तासांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मासेमारांना विशेष सूचना 

कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ४०-५० किमी प्रतितास पोहोचू शकतो त्यामुळे मासेमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात पिकांसाठी लाभदायक, पण अतिवृष्टीचा धोका

नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी या  जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम पाऊस तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी बरसतील.

विदर्भ मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात यलो अलर्टसह मुसळधार पाऊस तर ४०-५० किमी प्रतितास वेगाचे वारे वाहतील.

नदीकाठावर पाणीपातळी वाढू शकते त्यामुळे गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस

पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या  जिल्ह्यात ढगाळ आकाश, हलक्या ते मध्यम सरी बरसतील.

पुण्यात रिमझिम पावसामुळे उकाड्यात दिलासा मिळाला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज

नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यात ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यलो अलर्ट असलेले जिल्हे

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रायगड येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात बीड, नाशिक, जालना, परभणी, धाराशिव, लातूर येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामानातील बदलाचे काय आहे कारण?

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा व बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्र वारे.

तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यापासून कर्नाटकपर्यंत सक्रिय चक्राकार वाऱ्यांचा परिणाम.

नारळी पौर्णिमेला पाऊस हजेरी लावणार

मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावल्याने गेल्या आठवड्यात राज्यात उकाडा वाढला होता. आता हा उकाडा कमी होत असून, नारळी पौर्णिमेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, हा पाऊस सणांच्या आनंदात भर घालणारा ठरणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला 

* कापूस व सोयाबीनसाठी हा पाऊस पाऊस फायदेशीर आहे.

* ढगाळ व ओलसर हवामानात पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

* पिकांवर योग्य कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. 

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात पाऊस करणार कमबॅक; हवामान खात्याचा अलर्ट जारी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रमराठवाडाविदर्भमुंबई