Maharashtra Weather Update : मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात (Weather Update) सध्या जाणवत असलेले काहीसे ढगाळ वातावरण (Cloudy Weather), शनिवार दि. ३ मे पर्यंत म्हणजे आठवडाभर अजुन जाणवेल. पावसाची शक्यता मात्र किरकोळच समजावी. असे वाटते.
विदर्भ व मराठवाडा वगळता महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान हे ३८ ते ४० तर विदर्भ व मराठवाड्यात मात्र भाग बदलत ४० ते ४२ डिग्री दरम्यान जाणवत आहे. जाणवणारे तापमान हे सरासरी इतकेच समजावे.
शनिवार दि. ३ मे पर्यंत म्हणजे आठवडाभर या तापमानात (Maharashtra Temperature) एक दोन डिग्रीने वाढीची शक्यताही नाकारता येत नाही. रात्रीचा उकाडा व उष्णतेच्या लाटेची शक्यता महाराष्ट्रात मात्र ह्या आठवड्यात अजूनही जाणवणार नाही, असे वाटते.
वारा वहनाच्या शांततेतून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मात्र उष्ण व दमट पणा या आठवड्यात जाणवू शकतो, असे वाटते. थोडक्यात कोणत्याही टोकाच्या वातावरणाची शक्यता सध्या महाराष्ट्रात नाही.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.