Join us

Maharashtra Weather Update : IMD अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:34 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होतो न होतो तोच हवामान खात्याने पुन्हा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसाचा तडाखा कोकण, घाटमाथा आणि मुंबईला बसणार असून शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा आणि पिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाचा धुमाकूळ सुरू असून आता या पावसाचा जोर कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वाढला आहे. (Maharashtra Weather Update)

मराठवाडा आणि विदर्भाला थोडासा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार,  आज (१९ ऑगस्ट) रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई, रायगड, पुणे घाटमाथा, सातारा घाट, नाशिक घाट, पालघर व ठाणे या भागांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

कुठे कोणता अलर्ट?

रेड अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट

ऑरेंज अलर्ट : सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर

यलो अलर्ट : सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे शहर, कोल्हापूर, बहुतांश मराठवाडा आणि विदर्भ

समुद्रातही धोका!

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उंच लाटांचा इशारा दिला आहे.

२० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग येथे ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२१ ऑगस्ट रोजी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी येथे ३.५ ते ४.३ मीटर लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला  

अतिवृष्टीच्या काळात खरीप पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी या उपायायोजना कराव्यात

* शेतात पाणी साचू नये म्हणून निचऱ्याची सोय करावी.

* नाले, चर खोदून पाण्याचा प्रवाह बाहेर काढावा.

* भातासारखी पिके सोडून इतर पिके जास्त पाणी सहन करू शकत नाहीत.

* पिकांच्या मुळांभोवती पाणी राहिल्यास मुळकुज व रोगराई वाढते, त्यापासून बचाव करावा.

 * शेतमाल साठवण सुरक्षित ठिकाणी करून ठेवा.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असले तरी खरीप हंगामासाठी हा पाऊस वरदानही आहे. मात्र, अतिवृष्टीचे संकट टाळण्यासाठी सतर्कता आणि शेतकऱ्यांनी योग्य वेळी घेतलेली काळजी हाच मोठा उपाय ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : दहीहंडी सोहळा पावसातच; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसकोकणमराठवाडाविदर्भमुंबई