Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : किनारपट्टीत दमट उकाडा, विदर्भात विजांचा कडकडाट; नेमकं काय चाललंय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 09:22 IST

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा अजब खेळ सुरू आहे. दुपारी ३५ ते ३७ अंशांचा तडाखा आणि संध्याकाळी मेघगर्जनेसह सरी महाराष्ट्रात 'उन्हाळी पावसाळा'चं चित्र निर्माण झालं आहे. पुढील २४ तासांत नेमकं कुठं कोसळणार पावसाच्या सरी आणि कुठं वाढणार उष्णतेची लाट? जाणून घ्या सविस्तर अंदाज.(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा अजब खेळ सुरू आहे. एकीकडे तापमान झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे काही भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. (Maharashtra Weather Update)

उत्तर भारतापासून पश्चिमेकडील भागांपर्यंत होत असलेल्या हवामान बदलांचा परिणाम आता महाराष्ट्रातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. (Maharashtra Weather Update)

थंडीने राज्यातून काढता पाय घेतल्यानंतर बहुतांश भागांमध्ये उष्मा वाढला आहे. मात्र, गेल्या ४८ तासांपासून वातावरणात झालेल्या बदलांमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Weather Update)

कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार सरी

कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रविवारी सायंकाळी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

दाजीपूर अभयारण्य आणि फोंडा घाट परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसामुळे काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले.

सध्या राज्यात एकीकडे कडक उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे अवकाळी सरी अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

कुठे आहे यलो अलर्ट?

IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागांतही विजांसह तुरळक सरींचा अंदाज आहे.

अचानक उन्हाळी पाऊस का?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. या प्रणालीमुळे दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून वातावरणात आर्द्रता वाढली आहे.

परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळत आहेत.

उष्णतेची लाट कुठे जाणवणार?

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात पुढील २४ तास दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान : ३५ ते ३७ अंश सेल्सिअस

किमान तापमान : सुमारे २५ अंश

आर्द्रता जास्त असल्याने उष्मा अधिक जाणवणार

पश्चिम महाराष्ट्रात पहाटे किंचित गारवा असला तरी दिवसभर उन्हाचा तडाखा कायम राहील. किनारपट्टी भागात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.

आरोग्य सांभाळा!

हवामानातील या अचानक बदलांमुळे सर्दी, ताप, उष्माघात, डिहायड्रेशन यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.

* दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा

* भरपूर पाणी प्या

* हलका, सुती कपड्यांचा वापर करा

* वादळी पावसाच्या वेळी झाडांखाली थांबू नका

राज्यात सध्या 'उन्हाळी पावसाळा'सदृश परिस्थिती निर्माण झाली असून पुढील काही दिवस हवामानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा सविस्तर :Maharashtra Weather Update: उकाडा की पाऊस? महाराष्ट्रात हवामानाचा गेमच बदलला वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather: Update on State's Weather Conditions and Forecast

Web Summary : Maharashtra weather update indicates changing conditions. Stay informed about the latest weather forecast for various regions across the state. Prepare for potential shifts in temperature, rainfall, and overall weather patterns. Stay tuned for further updates.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा