Join us

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात धो-धो सरी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 09:19 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, कोकणासह मराठवाडा-विदर्भात मुसळधार सरी कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, कोकणासह मराठवाडा-विदर्भात मुसळधार सरी कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Maharashtra Weather Update)

गणेशोत्सवात राज्यात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बीड, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये धो-धो पावसाची शक्यता असल्याने हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाले, धरणे तुडुंब भरली आहेत. आता सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update)

मुंबईसह कोकण, नाशिक, पुणे जिल्ह्यांत जोरदार सरी

मुंबई आणि उपनगरांमध्ये मधूनमधून मध्यम पाऊस अपेक्षित असून, आकाश ढगाळ राहणार आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. कोकण पट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुण्याला ऑरेंज अलर्ट

पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी मुग-उडीद पिकाची तातडीने काढणी करून साठवण सुरक्षित ठिकाणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भ- मराठवाड्यात धो-धो सरी

बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह घाटमाथ्यालाही मुसळधार पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये मुसळधार सरी बरसतील. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही पुढील चार दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* मुग, उडीद यांसारखी काढणीस तयार पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी साठवावीत.

* शेतात उभ्या पिकांचे पाणी साचू देऊ नका. निचरा करण्याची व्यवस्था करून पिकांचे नुकसान टाळा.

* मुसळधार पावसामुळे किड-रोग वाढण्याची शक्यता आहे. शेतात नियमित फेरफटका मारून किडींचे निरीक्षण करा, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : बाप्पाच्या निरोपाला पावसाची साथ; IMD ने काय दिला इशारा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमराठवाडाकोकणविदर्भ