Join us

Maharashtra Weather Update : पावसाचा जोर कायम; IMD ने काय दिला अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 09:10 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.कसे असेल हवामान ते जाणून घ्या सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची माघार पश्चिम राजस्थानातून सुरू होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात पावसाची सक्रियता काही दिवस राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान सद्यस्थिती काय?

बंगालच्या उपसागरात ओडिशा-आंध्र किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.

ही प्रणाली १५ सप्टेंबरपर्यंत जमिनीवर येण्याची शक्यता असून त्यामुळे पावसाची तीव्रता वाढू शकते.

गंगानगर-रोहतक-राजनंदगावपासून कमी दाबाचा पट्टा दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरलेला आहे.

वायव्य अरबी समुद्रात ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय आहेत.

शनिवारी सकाळपर्यंत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विदर्भ आणि मराठवाडा विभागात पावसाचा जोर जास्त होता.

परभणी (पूर्णा) येथे १६० मिमी पावसाची नोंद झाली.

पालम येथे ११० मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाचा इशारा

ऑरेंज अलर्ट : रायगड

यलो अलर्ट : मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा

वादळी पावसाची शक्यता : नाशिक, अहमदनगर, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.

शेतकऱ्यांना सल्ला

* निचऱ्याची व्यवस्था करा, शेतात पाणी साचू देऊ नका.

* पिकांचे नियमित निरीक्षण करा, रोग किंवा कीड दिसताच उपाय करा.

हे ही वाचा सविस्तर :Maharashtra Weather Update : हवामान अपडेट: तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट आहे का? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रकोकणविदर्भ